धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समितीने नूतन पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेवून आपल्या कामकाजाविषयी माहिती दिली. यावेळी पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी समितीच्या कामाकाजासंदर्भात समाधान व्यक्त करून संघटना म्हणून आपण कशा प्रकारे जबाबदारी पार पारली पाहिजे. संघटनेने सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्वाचे आहे असे सांगितले.
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सदिच्छा भेट घेण्यात आली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक यांना बुके व पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.
सामाजिक विषयावरती चर्चा करत असताना शिवराज्याभिषेक सोहळा समिती कशा पद्धतीने आपले सामाजिक कार्य करत आहे. याविषयी चर्चा झाल्यानंतर अधीक्षक जाधव यांनी समिती करत असलेल्या मिरवणूकमुक्त शिवजन्मोत्सव सोहळा व सामाजिक कामाबद्दल समाधान व्यक्त केले. हे काम अविरतपणे चालू ठेवावे असे सुचविले. समिती शासन आणि प्रशासन यांचा समन्वय साधून समाजामध्ये कायद्याचे पालन व जनतेचे हित कशा प्रकारे करता येईल यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले. समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय केल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी समाधान व्यक्त केले.
आजच्या या सदिच्छा भेटीच्या वेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे माजी अध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष गौरव बागल, जिल्हा उपाध्यक्ष आकाश कोकाटे, शहराध्यक्ष मंगेश निंबाळकर, शहर उपाध्यक्ष आकाश भोसले, रिक्षा समिती अध्यक्ष योगेश आतकरे, तालुकाध्यक्ष अमोल सिरसट, तालुका सचिव श्री दत्तात्रय जावळे, विभाग प्रमुख हनुमंत तांबे, गुंडोपंत जोशी, ॲड. संजय शिंदे, भैरवनाथ रणखांब, अविनाश रणखांब इतर समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.