धाराशिव (प्रतिनिधी)- मौजे पाटोदा ता. धाराशिव येथील रामेश्वर विलास गायकवाड यांनी एमपीएससी मध्ये यश संपादन करुन पोलिस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शाल पुष्पगुच्छ व पेढे भरवुन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.
संस्थेचे अध्यक्ष नागनाथ गोरसे यांनी रामेश्वर विलास गायकवाड यांच्या बद्दल माहिती दिली जिद्द चिकाटीने अभ्यास करुन आजच्या तरुणांसमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे,तर गायकवाड यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले. निराश न होता प्रयत्न केल्याने तिसऱ्यांदा पास झालो. जिद्द चिकाटीने अभ्यास करुन ईडब्ल्युएस प्रवर्गातुन सन 2022 च्या प्रयत्नातुन 32 व्या रॅक वर यश मिळविले. इतर मान्यवर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या,यावेळी राजगीर संस्थेचे अध्यक्ष नागनाथ गोरसे,अंकुश उबाळे,धनंजय वाघमारे, संपतराव शिंदे,बंन्शी कुचेकर, बलभीम कांबळे,बाबासाहेब बनसोडे,रमेश कांबळे,गणेश वाघमारे,संजय गजधने,केदार गायकवाड,सरवदे सह इतर उपस्थित होते.सुत्रसंचलन धनंजय वाघमारे यांनी केले तर बलभीम कांबळे यांनी आभार मानले.