धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटना-1425 अंतर्गत धाराशिव जिल्हा परिषद जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फुलचंद व्हरकटे,  सचिवपदी जयप्रकाश हिरोळे, कार्याध्यक्षपदी गोपाळ पांचाळ, उपाध्यक्षपदी राहुल थापडे तर कोषाध्यक्षपदी किशोर ढेंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.

या निवडीबद्दल जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या  वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव व मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजयसिंह ठाकुर,  बुधाजी बोडखे, मकरंद कुलकर्णी, श्रीमती होळकर, श्रीमती माळी, प्रविण सुर्यवंशी, श्रीमती वाघमारे आदींसह सर्व लेखासंवर्गीय अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

 
Top