भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्यावतीने महसूल पंधरवडा मधून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतर्गत एका युवतीस नायब तहसीलदार प्रविण जाधव यांच्या हस्ते येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नियुक्तीपत्र देण्यात आले. भूम तालुक्यातील हे पहिले नियुक्तीपत्र असणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणार मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण व्दारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने महसुल व वन विभागकडून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 नोंदणीसाठी महसूल पंधरवडा आयोजित केला आहे.
बारावी, आयटीआय, पदविका, पदवी, पदवीधर शैक्षणिक पात्रता धारण केलेले आहेत अशा युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध ठिकाणातले छोटे-मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टप्स विविध आस्थापनाद्वारे आवश्यक असलेल्या मनुष्यबाची मागणी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे.
शासनाच्या नियम व अटीस अधीन राहून विद्यावेतनावर काम करून इच्छिणाऱ्या युवक, युवतींना पात्रतेनुसार सहा हजार, आठ हजार, दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षण योजने अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाने अंतर्गत नोंदणी केलेल्या भूम येथील नेहा शिवाजी टकले या युवतीस नायब तहसिलदार प्रविण जाधव यांचे हस्ते नियुक्ती पत्र शुक्रवार दि 2 ऑगष्ठ 2024 रोजी देण्यात आले.
प्राचार्य हर्षद राजूरकर जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीहरी सोळंके, गटनिदेशक जितेंद्र बांगर, निदेशक प्रणय भोंडेकर, दिनेश मुळे, अनिकेत खिलारे, अवधूत गवळी, हर्षद कळबंड रामेश्वर जाधवर संजित अघाव, पत्रकार शंकर खामकर, शिवाजी वसंतराव टकले आदिची यावेळी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत भूम येथील शासकीय आयटीआय येथे विद्या वेतनावर नियुक्ती मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करून आवश्यक ती कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे भूम, परंडा, वाशी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटिल, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, सरचिटणीस संतोष सुपेकर, पत्रकार शंकर खामकर आदींनी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला.