धाराशिव (प्रतिनिधी)- जोपर्यंत शिक्षण चालू असते तोपर्यंत विद्यार्थी निश्चिंत असतात. पण जेव्हा डिग्री पूर्ण होते तेव्हा खरे आव्हान समोर उभे राहते .त्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत असतानाच अभ्यासक्रमासोबत कौशल्यावर आधारित अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले तर नोकरीच्या संधी नक्कीच मिळतील .किंवा नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय करता येईल. त्यासाठी स्वतः मधली कौशल्य विकसित करावीत आणि यासाठी आपल्या महाविद्यालयाचा प्लॅटफॉर्म अत्यंत सुंदर आहे. अशा शब्दात महाविद्यालयाचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागाचे माजी विद्यार्थी आणि मावगेन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीत चांगल्या पॅकेजवर नोकरी करणारे योगेश्वर वामन कांबळे यांनी केले.
नुकत्याच त्यांनी महाविद्यालयाला दिलेल्या भेटीमध्ये करिअर विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .मेकॅनिकल इंजिनिअरिंग सारख्या शाखेमध्ये विद्यार्थी उत्तम करिअर घडवू शकतात. चांगले पॅकेज मिळू शकते. याचे आपण स्वतः उदाहरण असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेतून विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी सोबतच खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले .
येणारा काळ हा स्टार्टअप इंडिया ,मेक इन इंडिया मोदीजी यांच्या संकल्पनेअंतर्गत उद्योगाच्या नवनवीन संशोधनातून आपले कौशल्य वाढवून स्वतःचा उद्योगही विद्यार्थ्यांनी उभा करावा. असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने योगेशवर कांबळे यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. डी डी दाते यांनी सत्कार करून त्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या