भूम (प्रतिनिधी)- आरोग्य दूत डॉक्टर राहुल घुले यांनी भूम परंडा वाशी तालुक्यातील लोकांशी संवाद साधण्यासाठी चक्क महाराष्ट्र शासनाची एसटी बस बुक करून गाव भेट दौरा चालू केला.
भूमचे ग्रामदैवत आलम प्रभू देवस्थान येथून यात्रेला प्रारंभ करून तेरखेडा येथे देवी मंदिर व दर्गा येथे दर्शन घेऊन गिरवली येथे स्वर्गीय आमदार महारुद्र बाप्पा मोटे यांच्या समाधीस्थळी भेट देऊन पुष्प अर्पण केले. सध्याच्या राजकीय आखाड्यामध्ये सर्वच पक्षांनी कंबर कसली असल्याचे दिसत असताना कोणी डिजिटल माध्यमातून गावोगावी, वाडी वस्तीवर केलेल्या कामाचे प्रसारण दाखवीत आहे. तर कोणी संवाद साधण्याच्या भावनेने संवाद यात्रा चालू करून गाव भेट करून टीका टिपण्या केल्या जात आहेत. परंतु याच्या पलीकडे जाऊन आरोग्य दूध राहुल घुले यांनी राजकारण विरहित जनसामान्य माणसाच्या व समाजाच्या हिताचे काम जे असतील त्या कामावर चर्चा करण्यासाठी लोकांना आधार देण्यासाठी गाव भेट दौरा व देव देवतांची पूजा यासाठी एसटी महामंडळाची एसटी बुक करून डॉक्टर आरोग्य दूत राहुल घुले यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना घेऊन गाव भेट दौरा चालू केला आहे. या गाव भेटीला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. राजकारण विरहित चर्चा करून गावातील व्यक्तींसोबत आरोग्य विषयी चर्चा करून गावांमध्ये कुठले काम समाज उपयोगी करणे गरजेचे आहे. या संदर्भात चर्चा करून पुढील गावी संवाद यात्रा घेऊन जात आहेत.