भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील राजे अमरसिंह थोरात शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव महम्मद पटेल यांनी 15 ऑगस्ट निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. तर संस्थेचे सचिव महम्मद पटेल यांची कन्या आफरीन पटेल यांच्या हस्ते पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शिक्षण संस्था भूम संचलित राजे अमरसिंह थोरात मराठी प्राथमिक शाळाच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टचे निमीत्त दि. 14/08/2024 रोजी कन्या आफरीन पटेल यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. संस्थेचे सचिव महम्मद पटेल यांच्या हस्ते 15 ऑगस्टच्या निमीत्ताने महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतीमेचे पुजन करून ध्वजारोहन करण्यात आले.यानंतर पटेल यांच्या हस्ते झाल्यानंतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या अंगी असणा-या गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धा, गीत गायन, रांगोळी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण सोनवणे, सौ. तमन्ना तांबोली, सौ. जयश्री उनवणे, सौ. माधवी साठे, सौ. रिचा पवार, सौ. जया शेंडगे सर्व शिक्षिका यांनी सर्व स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडल्या.