धाराशिव (प्रतिनिधी)- दूरदर्शनचे निवृत्त संपादक तथा जेष्ठ पत्रकार शाहू पाटोळे यांनी लिहिलेले कडुसं या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता प्रा. ए. डी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. डॉ. माया शहापूरकर-पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जनसंज्ञापन विभागाचे सेवानिवृत्त विभागाप्रमुख प्रा. डॉ. रविंद्र चिंचोलकर हे उपस्थित राहणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषद शाखा धाराशिवच्यावतीने हा कार्यक्रम होत आहे. कडुसं या पुस्तकाचे प्रकाशन मिरा प्रकाशन छत्रपती संभाजीनगर या संस्थेने प्रकाशित केले आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मसापचे अध्यक्ष नितीन तावडे, सचिव माधव इंगळे, कोषाध्यक्ष बालाजी तांबे यांनी केले आहे.