धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील समता नगर भागातील नाले, रस्त्याचे कामे त्वरीत करण्याची मागणी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन संतोष घाटगे यांनी केली आहे.  

ही कामे अत्यंत संथगतीने चालु असून अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. सध्या पावसाळा असून रस्त्यावर जागोगाजी खड्डे पडलेली आहेत. नागरीकांना रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागते. खराब रस्ता असल्याने अनेक नागरीकांचे अपघात झाले आहे. नालीचे खोदकाम केल्याने व घाण पाणी साचुन डासांचा प्रार्दुभाव वाढला झालेली आहे. समता नगर मधील कामे निकृष्ट व संथगतीने चालु आ. कैलास पाटील यांना ही बाब तेथील सांगीतली त्यांनी स्वतः या कामावर येवून न.प. अभियंता  दुकर व सा.बां.वि. अभियंता मोरे यांना दि. 24 जुलै 2024 रोजी बोलून कामे दर्जेदार व तात्काळ करून नागरीकांची होणारी हेळसांड थांबवावी असे न.प. अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागचे अभियंता यांना खडसावले. सदरील न.प. अभियंता व सा.बं. कार्यकारी अभियंता सां.बा.वि यांनी सदरील कामे 08 दिवसात सुरळीत करू असा शब्द  आ. कैलास पाटील यांना दिला होता. परंतु सदरील काम हे आमदार दिलेल्या शब्दानुसार कालावधी संपून आज 10 दिवस झाले असून देखील काम संथगतीनेच सुरू राहिलेले असल्यामुळे सदरील कामे दि. 09 ऑगस्ट 2024 पर्यंत कामे सुरळीत व जलद गतीने चालु झाली नाही. तर दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी वार शनिवार पासून समता नगर येथे मंजूर असलेल्या कामांच्या ठिकाणी अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 
Top