तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हयात सर्वाधीक उंच आकर्षक मुर्तीसाठी  प्रसिध्द असलेले दयावान युवा मंच, यंदा 19 फुटी दशनान विण्यावर शंकर रुपी गणेश मूर्ती  प्रतिष्ठापना करणार आहे. मुर्ती बनविण्याचे काम सध्या सुरु आहे अशी माहिती  संस्थापक अध्यक्ष मिथून पोपळे यांनी दिली.

दयावान युवा मंच ची बैठक होवुन त्यात  प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सांस्कृतीक व सामाजीक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले असुन सदरील सर्व कार्यक्रम मंडळाच्या प्रथेप्रमाणे विनावर्गनी मंडळाच्या आयोजीत करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. यावर्षी प्रति वर्षाप्रमाणे तसेच मंडळाचे विशेष वैशिष्ट्ये  म्हणजे  सर्वांत उंच 20  फुटी आकर्षित गणेश मुर्ती, महिलांसाठी होम मिनीस्टर, लकी ड्रॉ, वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा,  प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी घेतल्या जाणार आहे. मंडळाचे हे 25 वर्ष पुर्ण झाले आहे. यंदाच्या मंडळाच्या अध्यक्षपदाचा मान मुस्लिम समाजातील दिदार सय्यद यांना दिला आहे. उपाध्यक्ष  सुरज गायकवाड, सचिवपदी युवराज शिंदे, तर कोषाध्यक्षपदी राजु चव्हाण,  कार्याध्यक्ष  कुनाल रोंगे, गणेश भोरे तसेच सभेचे मंडळाचे सदस्य राजु सातपुते, आस्तीक साखरे, छबीलाल परदेशी, कलीम शेख, उमेश देवकर, धीरज नरसुडे, सोनु साखरे, बाजीराव शिंदे, नितीन गुंजाळ, सुरज परदेशी विकास चौगुले, अमर गुंडगिरे, ओंकार इगवे, भैरुनाथ रोटे, रतन गरड, अदिंची निवड करण्यात आली. यावेळी  व मंडळाचे सभासद मोठ्या संख्यने उपस्थित होते.


 
Top