धाराशिव (प्रतिनिधी)- परांडा तालुक्यातील नागरीकांच्या प्रशासन संदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी परांडा येथील पंचायत समिती सभागृहामध्ये जनता दरबाराचे आयोजन करुन संबंधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनतेचे सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावणेबाबत सुचना करण्यात आल्या.  यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व माजी आमदार राहुल मोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

परांडा तालुक्यातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय परांडा व विविध शासकीय कार्यालयाकडील प्रलंबित प्रश्नाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.आगार प्रमुख म. रा. प. म., विविध बँकेचे व्यवस्थापक यांना तात्काळ सुचना देवून सर्व प्रश्न 10 दिवसाचे आत मार्गी लावणेबाबत सुचना दिल्या. याचबरोबर प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी जनतेच्या कामाप्रती तत्परता दाखवावी अशी सुचना ही केली.  तसेच पुढील जनता दरबाराच्या वेळी याबाबतचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा प्रमुख रणजित पाटील, तालुकाप्रमुख मेघराज पाटील, महिला आघाडी प्रमुख जिनत सय्यद, शहरप्रमुख रईस मुजावर, उपतालुका प्रमुख रमेश गरड, उपतालुका प्रमुख बुध्दीवान गोडगे, चंद्रकांत पाटील, युवासेना तालुका प्रमुख शिवाजी देवकर, सागर ठवरे, उमेश परदेशी, अब्बास मुजावर दिपक गायकवाड, हरी नलवडे, अमोल गोडगे आदीसह परांडा तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

 
Top