धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूक लढवून ॲड. विश्वजीत शिंदे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात वापस प्रवेश केला आहे.  टिळक भवन, मुंबई येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्याक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ॲड. विश्वजीत शिंदे यांनी कॉग्रेस मध्ये प्रवेश केला असुन त्यांची पुर्व पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

यावेळी लोकसभा निवडणूक लढल्या बद्दल व केलेल्या धाडसाबद्दल नाना पटोले यांनी ॲड. विश्वजीत शिंदे यांचे अभिनंदन केले आहे व पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या. धाराशिव जिल्ह्यात कॉग्रेस पक्ष वाढवावा आणि मजबूत करावा आणि कोणतीही अडचण आली तर थेट संपर्क साधावा असे निर्देष ही दिले. महाविकासआघाडी मध्ये आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणायचे आहे. तरी भविष्यात कॉग्रेस पक्ष निवडणूकीत तरुनांना संधी देणार असुन उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात तयारी करून ठेवा. भविष्यात वेळ पडू शकते असे ही सुचना ॲड. विश्वजीत शिंदे यांना दिल्या आहेत. तसेच तुळजापूर विधान सभा मतदार संघातून निवडणूक लढवता का ? असे गौरीशंकर सिद्रामप्पा मुळे यांना नाना पटोले यांनी विचारणा केली. या पक्ष प्रवेशामध्ये महाराष्ट्रील अनेक पक्षाच्या विविध कार्यकर्त्यानी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज पाटील व माजी खासदार मोहन दादा जोशी हे टिळक भवन येथे उपस्थित होते.  या कार्यक्रमास धाराशिव जिल्ह्यातील कॉग्रेसचे जेष्ठ नेते विश्वास आप्पा शिंदे, जिल्हाध्यक्ष धिरज पाटिल, जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद खलिल, युवा नेते उमेशराजे निंबाळकर, राष्ट्रीय समन्वयक गौरिशंकर मुळे, माजी नगरसेवक सिधार्थ बनसोडे, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, आरटीआय प्रदेश सचिव दत्ता तुपे, भारत जोडो यात्री अतिशा पैठणकर व मराठवाडा किसान अध्यक्ष अनिल पाटिल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सध्या धाराशिव जिल्हा कॉग्रेस पक्षात ॲड. विश्वजीत शिंदे हेच एकमात्र सर्वात मोठी लोकसभा निवडणूक लढलेले सक्रीय नेते आहेत.

 
Top