धाराशिव (प्रतिनिधी)- 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून बावी आश्रम शाळेच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.

विद्यानगर बावी येथील वसंत प्राथमिक जवाहर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय विद्यानगर बावी ता.जि.धाराशिव येथे ऑगस्ट क्रांती दिना निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य दयानंद मनोहराव राठोड व प्रमुख पाहुणे वाघमारे डी.व्ही. यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक साकळे बी.एस.यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांची क्रांतिकारका बद्दल भाषणे झाली. शिक्षकांमधून प्राध्यापक अमोल शिंपी यांनी क्रांती दिनाबद्दल सखोल माहीती सांगत आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक विनोद राठोड यांनी केले. क्रांती दिनाचे औचित्य साधून आश्रमशाळेच्या www.ashramshala.in <http://www.ashramshala.in/> या वेबसाईटचे प्रा.डॉ.संतोष वडगणे व गुंजाळ शंकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top