उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा वकील मंडळाची निवडूक होवून ॲड. प्रविण तोतला व ॲड. दिलीप सगर पॅनेलचे खालील पदाधिकारी प्रचंड मतांनी निवडून आले. नूतन अध्यक्ष ॲड. मोहनराव कोथिंबीरे, उपाध्यक्ष ॲड. मल्हारी बनसोडे, सचिव ॲड शिवाजीराव बिराजदार, कोषाध्यक्ष ॲड. कृष्णा पाटील सहसचिव, ॲड. भाग्यश्री गुंड-पवार यांचा माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी सत्कार केला.
यावेळी नूतन अध्यक्ष ॲड कोथिंबीरे यांनी वकीली हा व्यवसाय न मानता जनसेवा समजून पक्षकाराला न्याय देवू असे म्हणाले. यावेळी ॲड मोहनराव चिंचोलीकर ॲड. विनायकराव माने परिवार व बेरड समाज, हनुमान बिगर शेतकरी पथसंस्था बेटजवळगा येथील प्रा. गायकवाड व ॲड. शितल चव्हाण फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. आळंगे, ॲड. प्रविन तोतला, ॲड. दिलीप सगर, ॲड. पत्रिके, ॲड. अर्चना जाधव, ॲड. माळी, ॲड शिल्पा सुरवसे, ॲड. परिक्षीत कोथिंबीरे, ॲड. जान्हवी कोथिंबीरे, रोटरी क्लबचे साळूंके हे उपस्थित होते.