धाराशिव (प्रतिनिधी)-  दर वर्षी 28 जुलै रोजी जागती हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. जागतीक आरोग्य संघटनेने  "Its time for action"यावर्षी हिपॅटायटीस दिनाचे घोष वाक्य प्रसिध्द केलेले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार हिपॅटायटीस दिना निमित्त दि.22 जुलै 2024 ते 03 ऑगस्ट 2024 या दरम्यान पंधरवाढा साजरा करण्यात आला तसेच दि. 03 ऑगस्ट 2024 रोजी जनजागृती रॅली व पथनाटय कार्यक्रम संपन्न झाले. या व्दारे धाराशिव जिल्ह्यात हिपॅटायटीस आजारा बाबत व्यपक प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम हा महाराष्टातील सर्व जिल्हामध्ये सुरू करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमाअंतर्गत राज्यात 4 आदर्श उपचार केंद्र व 32 उपचार केंद्र यांची उभारणी करण्यात आलेली आहे सदर केंद्रामार्फत हिपॅटायटीस बी व सी रुग्णाची तपासणी व औषधउपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

हिपॅटायटीस या आजाराबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी दर वर्षी 28 जुलै रोजी जागतीक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो, जागतीक आरोग्य संघटनेने "Its time for action" या वर्षी हिपॅटायटीस दिनाचे घोष वाक्य प्रसिध्द केलेले आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या सुचनेनुसार हिपॅटायटीस दिनानिमित्त पंधरवाडा दिनांक 22.07.2024 ते 03.08.2024 या दरम्यान साजरा करण्याबाबत सुचति केले आहे. या अनुशंगाने जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.एन.एस. धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  Orientation and review Meting 25.07.2024 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात झालेली आहे, तसेच हिपॅटायटीस बी व सी पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णाचा व्हायरल लोड करण्यात आला. तसेच दि. 28.07.2024 राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रमाची जगजागृती करण्यासाठी शासकीय आरोग्य संस्था, प्रमुख सार्वजनिक ठिकाणी यामध्ये एसटी स्टॅड, रेल्वे स्टेशन, उपहार गृह, स्थलांतरीत वस्ती, वाडे, तांडे यांच्याकडे जाउन त्यांना हिपॅटायटीस या आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली तसेच दि. 31.07.2024 रोजी जिल्हा कारागृहातील कैदांची हिपॅटायटीस बी व सी ची तपासणी करण्यात आली. तसेच दि. 03.08.2024 जागतीक हिपॅटायटीस दिनानिमित्त धाराशिव जिल्हयाचे जिल्हाधिकारी, डॉ. सचिन ओंबासे, मा. पोलिस अधिक्षक, डॉ. अतुल कुलकर्णी,  अधिष्ठाता, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव डॉ. शिल्पा डोमकुंडवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. धर्माधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ, निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.सं), डॉ शिवाजी फुलारी, डॉ. सचिन देशमुख सर (अध्यक्ष धाराशिव), जिवन कुलकर्णी, जि.ले. व्यवस्थापक धाराशिव,  समन्वयक श्रीमती सुनिता साळुंके, लॅब टेक्नेशियन श्री. विशाल नेजगावकर, फार्मासिस्ट,  स्वप्नील कानडे, यशोदिप कदम व  रोहित पांढरे व इतर सर्व विभागाचे वैदयकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलें त्यानंतर शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विदयार्थ्यानी हिपॅटायटीस संबंधी पथनाट्य सादर केले व या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. श्रीधर भांगे यांनी केले. अशा प्रकारे जागतीक हिपॅटायटीस पंधरवाढा सजरा करण्यात आला.

 
Top