धाराशिव (प्रतिनिधी)-रूपामाता पूर्व प्राथमिक शाळा सांजा रोड धाराशिव येथे महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा व अक्षरगंगा परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथम विद्यार्थ्यांनी भाषण केले त्यात संस्कार शिखरे, आदर्श काशिद, वैभवी लोहार, उजमा सय्यद, आदित्य चांदणे हे होते. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. 

इयत्ता चौथी मधील संविधान शेंडगे, कृष्णाली अनभुले यांनी महाराष्ट्र एमटीएस विशेष प्रविण्यासह ब्राँझ मेडल मिळवले. तसेच आर्यन निर्मळे, श्रावणी आवारे, यांनी तर तिसरी इयत्तेमधील महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत रुद्राक्ष गायकवाड, सोहम सूर्यवंशी अफिफा मुजावर यांनी यश मिळवले.

अक्षरगंगा परीक्षेत संस्कार शिखरे,अजहर सय्यद, वैभवी लोहार, संस्कृती श्रीखंडे, आदर्श काशीद, फर्मान मुजावर, आदर्श चव्हाण (सर्वजण दुसरी), सोहम जगताप, गंगासागर शिंदे, गायत्री काळे,श्रद्धा चव्हाण, उजमा सय्यद,वर्धान चांदणे (सर्वजण पहिली) यांनी विशेष प्रावीण्य मिळवले.

ॲड. व्यंकटराव गुंड यांनी वरील विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता पहिली आणि दुसरी विद्यार्थ्यांसाठी  ए. ए. पेठे आणि आर. बी. यादव तसेच इयत्ता तिसरी आणि चौथी साठी जी. बी. गुंड, व्ही. ए. पिंपरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ए. जी. सवपल्ली, ए. एस. लोहार, एस. केंगार, ए. ए. पेठे, एस. एस. लोंढे उपस्थित होते.

 
Top