धाराशिव (प्रतिनिधी)-अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा धाराशिव चे उद्घाटन प्रमुख पाहुणे केंद्रीय अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते युवराज नळे यांना शाखा संलग्नता पत्र देऊन झाले. प्रमुख उपस्थितीत म्हणून डायटचे प्राचार्य डॉ दयानंद जटनुरे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख, केंद्रीय संस्थेचे सदस्य विनोद वाघ, एम डी देशमुख, डॉ अभय शहापूरकर, राजेंद्र अत्रे, डॉ मनीष देशपांडे, सुरेश शेळके, हभप ॲड लोमटे हे होते. निर्वाचित अध्यक्ष युवराज नळे यांनी सर्व पदाधिकारी आणि स्वतःची जबाबदारी सांगत भविष्यात बालकुमारसाठी अनेक उपक्रम राबविले जातील असे सांगून त्यासाठी सर्वांना उपक्रम सुचवून राबविण्याचे स्वातंत्र्य आहे हे नमूद केले. तसेच आजच्या सभेत युवराज नळे यांंनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा असा ठराव मांडला, त्याला जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे यांनी अनुमोदन दिले व ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे रितसर पाठवून पाठपुरावा करणार असल्याचे युवराज नळे यांनी सांगितले. संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष राजन लाखे यांनी बाल साहित्याची आवश्यकता सांगताना अनेक दाखले दिले. शिवाय बालकुमारांना संगणक, मोबाईल मधून बाहेर काढण्यासाठी वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे हे विशेषत्वाने सांगितले आणि धाराशिवकरा बद्दल गौरवोद्गार काढून अध्यक्ष युवराज नळे यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले.राजन लाखे यांच्या हस्ते शाखेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देखील देण्यात आले. डॉ जटनुरे आणि डॉ जयसिंगराव देशमुख यांनीही उद्घाटनपर शुभेच्छा दिल्या. संजय धोंगडे यांनी बालसाहित्याचे आकर्षक प्रदर्शन लावले होते ज्याचा सर्व साहित्य रसिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे आणि सुनिता गुंजाळ कवडे यांनी केले. प्रास्ताविक बालकुमार चे कार्यवाह समाधान शिकेतोड यांनी करताना बालकुमार साहित्य संदर्भात संस्थेने तयार केलेला कृती कार्यक्रम विशद केला तर आभार प्रदर्शन मीना महामुनी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात आर्य चाणक्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्र गीत सादर करून करण्यात आली तर राष्ट्रगीताने समारोप झाला. यावेळी हनुमंत पडवळ, प्रा विद्या देशमुख, प्रा अलका सपकाळ, डॉ शिवाजी गायकवाड, डॉ मधुकर हुजरे, विजय गायकवाड, शंकर खामकर, आनंद वीर, अश्विनी धाट, सुषमा सांगळे, अश्रूबा कोठावळे, स्नेहलता झरकर, उषा सर्जे, मुकुंद पाटील, विनोद कुलकर्णी, राजाभाऊ कारंडे, अस्मिता शिंदे, प्रभाकर बनसोडे, मनिषा क्षिरसागर, धनंजय कुलकर्णी, सोनाली अरडले, सुलभा देशमाने, संगीता थडवे, अविनाश मुंडे, सुवर्णा शिनगारे, ॲड जयश्री तेरकर, वर्षा नळे, प्रा अभिमान हंगरगेकर, गणेश वाघमारे, अब्दुल लतीफ, बाबासाहेब गुळीग, कृष्णा साळुंके, अथर्व कुलकर्णी, युसुफ शेख, वेदांत गुरव, वैभव वाघचौरे यांच्या सह साहित्यिक व रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.