धाराशिव (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखा गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी उमरगा हद्दीत गस्त घालत होते. त्याच वेळस पथकास वाहन क्र. एम.एच.25 एजे 3021 संशयास्पद येत असल्याचे दिसले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने वाहन थांबून चौकशी केली असता प्रतिबंधित असलेला पान मसाला व गुटखा 6 लाख 24 हजार रूपयाचा हाती लागला. यावरून सदर आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटख्याची वाहतुक होत आहे. अशी बातमी मिळाल्यावरून औराद पाटी चौरस्ता उमरगा येथे रस्त्यावर पथकाने संशयावरुन महिंद्रा जितु वाहन क्र. एम.एच.25 एजे 3021 वाहनास थांबवून चालकास विचारले असता त्यांने त्याचे नाव इफतेकार सय्यद तांबोळी, वय 50 रा. नारंगवाडी ता. उमरगा जि. धाराशिव असे सागिंतले. त्यावर पथकाने त्यांना वाहनामध्ये काय आहे विचारपुस केली असता त्यांने पथकास उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यावर पोलीस पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी नमुद वाहनाची झडती घेतली. एकंदरीत त्या महिंद्रा जितु वाहनामधून एकुण 2 तंबाखुचे सुतळी पोते, 25 सुतळी पोते विमल पान मसाला असा एकुण 6 लाख 24 हजार रूपये किंमतीचा गुटखा व तंबाखू पान मसाला, वाहनासह 8 लाख 86 हजार 400 रूपये किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ वाहून नेत असल्याचे आढळले. यावर पथकाने नमूद गुटखा व वाहतुकीस वापरलेली महिंद्रा जितु वाहन असे जप्त करुन नमूद गुटखा हा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत असल्याची खात्री करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आरेापी इफतेकार सय्यद तांबोळी यांच्याविरुध्द पोलिस ठाणे कळंब येथे गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक  गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पोहेकॉ सय्यद हुसेन, समाधान वाघमारे, पोना अशोक ढागारे, बबन जाधवर, रवी आरसेवाड, साईनाथ आशमोड, योगेश कोळी, चालक महेबुब अरब  यांच्या पथकाने केली आहे.


 
Top