तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.                                    

मोठा गट  नववी ते दहावी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक  प्रांजली देशमुख ,द्वितीय  श्रिया फंड, तृतीया  स्नेहल कोळेकर ,लहान गटात पाचवी ते आठवी प्रथम क्रमांक प्रगती भक्ते , द्वितीय  समर्थ घाटशिळे, तृतीय रुद्र बारबोले ,रांगोळी स्पर्धेत प्रथम  श्रावणी थोडसरे , द्वितीय  प्रज्ञा देशमुख ,तृतीय सायली कदम, उत्तेजनार्थ  वैष्णवी पवार, चित्रकला स्पर्धेत प्रथम  सोहम लाड द्वितीय  सिद्धेश्वर रसाळ तृतीय  अफान शेख या विजेत्यांना तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड ,तेर सोसायटीचे माजी चेअरमन व्यंकटराव माळी, राम देशमुख, काकासाहेब मगर यांच्या हस्ते वितरण  करण्यात आले.यावेळी  मुख्याध्यापक संतोष गायकवाड,प्रा.प्रदिप कोकाटे ,प्रा.दयानंद फंड,प्रा.सुवर्णा घुटके,अच्युत हाजगुडे ,नंदकुमार खोत ,बिभीषण देठे, सूर्यकांत जाधव ,रमेश लकापते, पुरूषोत्तम घोरपडे, नवनाथ पांचाळ, शरद सोनवणे,  सुधाकर चव्हाण, निळकंठ लाकाळ ,हजरबी सय्यद, नवनाथ जाधव, राधाकृष्ण राऊत उपस्थित होते. यावेळी नंदकुमार खोत यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ पांचाळ यांनी केले.

 
Top