धाराशिव (प्रतिनिधी)-रूपामाता समूहाचे संस्थापक  ॲड व्यंकटराव गुंड यांनी तुळजापूर मतदारसंघातील चिखली, देवसिंगा (नळ) निळेगाव, दाउतपुर, इर्ला, खानापूर, फुलवाडी, सांगवी, कामेगांव, इटकळ,केशेगाव, दिंडेगाव, काकेगांव, आरबळी, नांदुरी, भंडारी आणि गोगाव या विविध गावात भेटी घेऊन लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.  उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकरी, युवक तसेच महिला बचत गटांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आणखीन बळ देणार व  शेतकऱ्यांनी शेतीच्या माध्यमातून जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी 'रुपामाता परिवार' सदैव पाठीशी असल्याची उपस्थित ग्रामस्थांना बैठकीच्या माध्यमातून ग्वाही देण्यात आली.  दिग्विजय इंडस्ट्रीजचे चेअरमन विक्रम सुरवसे यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते दौऱ्यासाठी परिश्रम घेत आहेत.

 
Top