धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या माध्यमातून वर्ष 2023-24, मध्ये ज्या क्लब व व्यक्ती यांनी उत्कृष्ट कार्य केले त्यांना पारितोषिके देऊन पाचगणी येथे दिनांक 4 ऑगस्ट रविवारी सत्कार करण्यात आला.रोटरी क्लब उस्मानाबादला नऊ पारितोषिके प्राप्त झाली.
सर्वोत्कृष्ट ट्रस्ट मॅनेजमेंट प्रथम क्रमांक, पोलिओ निधी प्रथम क्रमांक, धाराशिव ते कन्याकुमारी सायकल प्रवासाचा प्रकल्प, उत्कृष्ट नेत्र रुग्णालय, जास्तीत जास्त नेत्र शस्त्रक्रिया, उत्कृष्ट डीजी व्हिजीट, उत्कृष्ट क्लब व्यवस्थापन, उत्कृष्ट क्लब सेक्रेटरी, अशी विविध पारितोषिके मिळाल्याबद्दल रोटरि क्लब उस्मानाबादचे सदस्य आनंद व्यक्त करीत आहेत. या यशाबद्दल वर्ष 2024-25 चे अध्यक्ष डॉ. श्रीराम जिंतूरकर व सचिव आनंद कुलकर्णी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.