उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील येणेंगुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवंता मानांकन मिळाले आहे. या आरोग्य  केंद्राला 89.21 गुण मिळाले आहेत. अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळे हे यश प्राप्त झाले असल्याची माहिती प्रा. आ.केंद्राच्या आरोग्य अधिकारी ऋतुजा साळुंखे यांनी माहिती दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सार्वजनिक रुग्णालयाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके उपक्रम राबवण्यात येत आहे. या नुसार 12 व 13 जुलैला येणेगुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके परीक्षण समितीकडून मूल्यांकन पडताळणी करण्यात आली. या वेळी तपासण्यात आलेल्या बाह्य रुग्ण विभाग, अंतर रुग्ण विभाग, प्रसुती विभाग, प्रयोगशाळा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, सामान्य प्रशासन व परिसर स्वच्छता या सहा सुविधांना प्रमाणित करून आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन देण्यात आले. या मुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवा सुविधां त्यांचा दर्जा दर्जाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्राकडे बघण्याची विश्वासार्हता नक्कीच वाढेल. मानांकनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास डॉ.मारुती कोरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार नेहरकर, आदींच्या मार्गदर्शनाखाली येणेगुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा साळुंखे, डॉ. रूपाली आंग्रे,डॉ.वैष्णवी जाधव,आदींनी परिश्रम घेतले.या करिता आरोग्य कर्मचारी, आशा, ग्रामपंचायत प्रशासन, आदींनी पुढाकार घेतला असल्याची माहिती डॉ ऋतुजा साळुंखे यांनी दिली.

 
Top