धाराशिव (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्यांची सोडवणूक करण्यासाठी आयोजीत केलेल्या जनता दरबारामध्ये पंतप्रधान सुर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सौरऊर्जा निर्माणकरून वीजबिलातून मुक्त होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी नागरिकांना केले. याप्रसंगी योजनेची माहिती देणाऱ्या प्रसिध्दी पत्रकाचे विमोचनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
शुक्रवारी (दि.१६ ऑगस्ट) भूम येथील तहसील कार्यालयात आयोजित जनता दरबारात संवाद साधत सुर्यघर योजना ही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वकांकशी योजना असून सौरऊर्जेच्या माध्यमातून ३०० युनीट मोफत वीज देण्याचे स्वप्न साकार करण्यासाछी पंतप्रधान सुर्यघर मोफत वीज योजनेची षंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने प्रत्येक वीजग्राहकापर्यंत पोहचून माहिती द्यावी असे निर्देश पालकमंत्री सावंत यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी सभापती दत्ता साळुंके,माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, बाळासाहेब हळउमरीकर, बालाजी गुंजाळ, जिल्हा परिषदेचे माजी कृषी समिती सभापती अण्णासाहेब देशमुख व बाळासाहेब क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भूम तालूक्यातील वीज समस्यांची दखल घेत तातडीने उपाय योजना कराव्यात अशा सुचना महावितरणच्या धाराशिव मंडलाच्या प्रभारी अधीक्षक अभियंता श्रीमती निलांबरी कुलकर्णी यांना दिल्या.