धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि 18 ऑगस्ट रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अभ्यासक युवराज नळे आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अभय इंगळे यांनी नेताजींच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी युवराज नळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन चरित्राचा पट उपस्थितांसमोर उलगडून दाखवत भारताला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये नेताजींचे किती मोठे योगदान होते हे विशद केले. याप्रसंगी अमोल राजेनिंबाळकर, सुनिल पुनगुडवाले, रोहित देशमुख, अरुण पेठे, सागर दंडनाईक व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थिती होती.