तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीरातील होमकुंडा समोर नागपंचमी निमित्ताने मातीची नागप्रतिमा बनवण्यात येवुन ती शुक्रवार पहाटे चरणतिर्था नंतर प्रतिष्ठापीत करण्यात आली होती. सुर्य मावळतील सदरील मातीची नाग मुर्ती श्रीकल्लोळ तिर्थ कुंडात आणुन तिथे मुर्तीची विधीवत आरती धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्या हस्ते करण्यात आली. सदरील माती नागमुर्तीचे कल्लोळ तिर्थकुंडात विसर्जन करण्यात आले. यावेळी भवानी शंकर मंदीराचे पुजारी महेश इनामदार, अभियंता प्रविण अमृतराव, संकेत वाघे, गणेश नाईकवाडी उपस्थितीत होते.