तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील बजाज शोरूम मधील 125 पेट्रोल अधिक सीएनजीवर चालणाऱ्या मोटरसायकलचे माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 

सध्याच्या महागाईच्या युगामध्ये  वर चालणारी वाहने अत्यंत उपयुक्त असून लोकांना आकर्षित करणारी आहेत. या गाडीला तरुण वर्गकडून मोठी मागणी येईल अशा अपेक्षा मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, संदीप गंगणे, शिवसेनेचे अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख अमीर शेख, अण्णासाहेब शिरसागर, मेजर राजेंद्र जाधव, अभिजीत लोके, मोहसीन बागवान, प्रदीप इंगळे, माजीद शेख, ऋषिकेश माने, मुन्ना राठोड, आकाश पवार, असिफ शेख, समीर शेख इत्यादी उपस्थित होते.

 
Top