धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या अधिपत्याखाली बुलढाणा जिल्हा रोलबॉल संघटनेच्या वतीने चिखली (बुलढाणा) येथे होणाऱ्या 14 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी धाराशिव जिल्हा मुलाचा संघ जिल्हा संघटनेचे सचिव गिरीश पाळणे आणि निवड समिती अध्यक्ष प्रताप राठोड यांनी जाहीर केला.

धाराशिव जिल्हा रोल बॉल संघटनेच्या वतीने गुंजोटी येथे घेण्यात आलेल्या 14 वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेतून मुलांचा संघ ठेवण्यात आला. स्पर्धेत तांत्रिक समिती अध्यक्ष कैलास लांडगे आणि सचिव साई राठोड यांनी काम पाहिले आहे.

निवड करण्यात आलेल्या संघात अधिराज जाधव (कर्णधार), ओमकार सोनवणे, श्लोक खंडाळकर, अल्तमश अत्तार, सोहम क्षीरसागर, अर्णव गिराम, असद शेख, असीम इनामदार, श्रेयन राठोड आदींचा समावेश आहे. संघ मार्गदर्शकपदी प्रताप राठोड व संघ व्यवस्थापकपदी साई राठोड यांची निवड करण्यात आली आहे.

 
Top