कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील सावर गाव पू भागातील हनुमान मंदिरात प्रती वर्षा प्रमाणे या हि वर्षी 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधित परंपरागत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये हभप. प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांची भागवत कथा होणार असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.
या सप्ताह मध्ये हभप. नारायण महाराज पिंपरीकर, हभप. गणेश महाराज जोगदंड, हभप. भगवान महाराज वरपगाव, हभप. महादेव महाराज बोराडे, हभप. प्रशांत महाराज ठाकरे, हभप. प्रकाश महाराज बोधले, हभप. रणदिवे बापू महाराज, यांची हरी किर्तन सेवा होणार आहे. शनिवार तारीख 17 ऑगस्ट रोजी हभप. संदीपान महाराज हसेगावकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समिती कडून करण्यात आले आहे.