भूम (प्रतिनिधी)- आरोग्याची काळजी घेतली, कष्ट केले म्हणूनच चांगले दिवस पाहायला मिळाले. आज चार माणसात सन्मान मिळत आहे. युवकांनी देखिल या पुढील काळात माणूसकी जागृत ठेवण्यासाठी प्रत्येक काम इमानदारीनेच करावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष शिवाजी गाढवे यांनी जेष्ठ नागरिक दिनाच्या दिवशी सत्कार प्रसंगी बोलताना केले.
बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा केला. यावेळी माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नागरिक शिवाजी गाढवे, भाजपचे भूम, परंडा, वाशी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, तालुका उपाध्यक्ष समाधान अंधारे, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, माजी सैनिक अध्यक्ष हेमंत देशमुख, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर , मुकुंद वाघमारे, शांतीराज बोराडे, मारुती चोबे, अमोल लोंढे सह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नागरिक श्रीमंत गाडे, आप्पाराव सानप, भागवत कोंडीबा वरळे, दिगंबर दत्तू मुसळे, अण्णा बाबा देवकते , सोपान काळे, बाबा गुळवे, धोंडीराम जाधव, सुरेश उपरे रमोल परसू माळी वालवडसह असंख्य ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. प्रसंगी अनेकाने 1952 च्या दरम्यान माजी आमदार राणीतारा राजा व गजराबाई यांच्या सहवासातले अनुभव व्यक्त केले. भूम ते बार्शी बैलगाडीने प्रवास केला. तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्याची देखील आठवण करून दिली.