भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील प्रमुख रस्ता गोलाई चौक ते एमआयडीसी या रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्पीय निधीमधून 4 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी फुटपात व गटारी कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. भूम येथे 16 ऑगस्ट रोजी जनता दरबार झाल्यानंतर पालकमंत्री तानाजी सावंत यांनी या कामाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर. आर. गिराम व संजय गाढवे यांच्यासोबत पाहणी करून या कामासाठी अतिरिक्त चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गोलाई ते एमआयडीसी या रस्त्यासाठी एकूण 17. 4 कोटी रुपये अर्थसंकल्पीय निधीमधून मंजूर करण्यात आले असून रस्त्यासाठी 10 कोटी, पुल कामासाठी 3.40 कोटी तर फुटपात व गटारी कामासाठी 4 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यासाठी अतिरिक्त चार कोटी निधी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी पालकमंत्री सावंत यांच्याकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य करून लगेच निधी उपलब्ध करून दिला आहे.

हा रस्ता गोलाई चौक ते शासकीय दूध योजना इथपर्यंत सिमेंट रस्ता असून शासकीय दूध योजना ते एमआयडीसी इथपर्यंत डांबरीकरण आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटार राहणार आहे. हा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय निधीमधून होणार आहे. अंदाजीत साडेतेरा कोटी रुपये खर्च करून हा रस्ता होणार आहे. या रस्त्याची लोकांकडून वारंवार मागणी होत होती. हा रस्ता पूर्णपणे खराब झाला होता. दोन्ही बाजूनी नाली पूर्णपणे खराब झाल्यामुळे रस्ता व गटारीचे काम होणे गरजेचे होते. नाबार्ड मार्फत पुलाचे काम चालू पूर्ण झाले असून, शासकीय दूध योजना ते माऊली मंदिरापर्यंत जे चढ-उतार आहेत. ते पूर्णपणे भरून घेतले जाणार आहेत. या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त होते. चढउतार खड्डा भरून घेतल्यानंतर येथे अपघात होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. भूम- वारदवाड़ी व राज्य मार्ग क्रमांक 62 या रस्त्याच्या कामास येत्या दोन दिवसात सुरुवात होणार असून भूम गोलाई चौक ते एमआयडीसी पर्यंत रस्त्याच्या कामास प्रारंभ शासकीय बांधकाम उपविभाग भूम उपविभागीय अभियंता आर. आर. गिराम व कंत्राटदार पी. एम. पैकीकर यांच्याकडून व माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या निगराणीखाली लवकरच चालू करण्यात येणार आहे.


 
Top