धाराशिव (प्रतिनिधी)- दुध अनुदानासाठी लावलेल्या अटी शिथील करुन शेतकयांना शासकीय हमीभाव प्रती लिटर 30 रुपयेप्रमाणे येत्या चार दिवसात वाटप करणेबाबत संबंधीतास सुचित करण्यात यावे, अन्यथा या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगाकवर यांनी जिल्हाधिकारी यांना बुधवारी (दि.21) दिलेल्या निवेदनात दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, दुध उत्पादक शेतकयांना शासनाने प्रती लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान जाहीर केलेले आहे. सदरील अनुदान जाहीर करता शासनाने असे सांगितले आहे की, दुधाचे फॅट 3/5 व एसएनएफ 8/5 असेल तरच दुधाला 30 रुपये प्रती लिटर हमीभाव दिला जाईल. परंतू कांही दुध डेअरी चालक, मालक, कंपन्या दुधाला फॅट बसत असताना देखील तेवढा भाव देत नाहीत. तसेच दुध अनुदानासाठी लावलेल्या अटी शिथील करुन शेतकयांना शासकीय हमीभाव प्रती लिटर 30 रुपयेप्रमाणे येत्या चार दिवसात वाटप करणेबाबत संबंधीतास सुचित करण्यात यावे. अन्यथा या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.