धाराशिव (प्रतिनिधी)-सुप्रसिध्द लेखक दिग्दर्शक शरद गोरे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत “सूर्या” या मराठी चित्रपटामध्ये धाराशिव येथील युवा कलाकार विक्रांत नळे याने महत्वपूर्ण भूमिका साकारली असून या चित्रपटाची 2024 मध्ये प्रतिष्ठित फ्रान्स देशातील कान्स चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. हा चित्रपट एका शेतकरी कुटूंबातील गरीब विद्यार्थ्याचा संघर्षमय प्रवास सांगणारा हा चित्रपट आहे अनेक संकटांशी झुंज देत होऊन कलेक्टर होण्याचे स्वप्न साकार करतो,जगभरातील 2000 चित्रपटातून टॉप 50 चित्रपटांमध्ये निवड या महोत्सवासाठी झाली आहे यातून वितेत्यांची निवड होणार आहे.
एखाद्या व्यक्तीरेखेचा जीवनावर सकारात्मक प्रभाव कसा पडतो असे चित्रपटाचे कथानक प्रेरणा,परिश्रम आणि दृढनिश्चय या विषयांभोवती विणलेले गेले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाच्या निवडीमुळे या चित्रपटात काम करणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक प्रतिभावान कलाकारांना ओळख मिळणार असून बार्शी,सोलापूर,अकलूज, कुर्डूवाडी,या सोलापूरसह जिल्ह्यातील विविध भागात चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. सुनील साबळे,अमोल कुंभार, सुजाता काळोखे, राहूल शिंदे यांनी हि आपल्या भूमिका सफाईदारपणे वटवल्या आहेत, प्रगती सूर्यवंशी , महारुद्र जाधव, फुलचंद नागटिळक आदी जण पाहुणे कलाकराच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘सूर्या'मागील बहुआयामी प्रतिभा असलेल्या शरद गोरे यांनीही खलनायकाची भूमिका खूप सशक्तपणे साकारली आहे. शरद गोरे,प्रकाश बनसोडे,सूवर्णा पवार यांची गीते असून शरद गोरे यांनी संगीतबध्द केले आहे,तर चित्रपटाचे छायांकन रवींद्र लोकरे यांनी केले आहे. तर शरद मधुकर गोरे व नितीन रतीलाल पाटील हे चित्रपटाचे निर्माते आहेत. प्राची सूर्यवंशी मुख्य अभिनेत्री असून या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका नितीन रतीलाल पाटील यांनी कलेक्टरची भूमिका खूप प्रभावीपणे साकारली आहे. नील पाटील तसेच धाराशिव येथील कलाकार विक्रांत नळे याने या चित्रपटात मध्यवर्ती पात्र असलेल्या सूर्या ची कुमारावस्थेतील भूमिका उत्तमपणे साकारली आहे. चित्रपटाचे यश हे त्याच्या दूरदृष्टीचा आणि कथाकथनाच्या समर्पकपणाचा पुरावा आहे. या अगोदर रणांगण एक संघर्ष, उषःकाल,प्रेमरंग आदी चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन शरद गोरे यांनी केले आहे. 'सूर्या' हा एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी चित्रपट आहे जो जगभरातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. धाराशिव येथील कलाकार विक्रांत नळे याने या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका असलेल्या सूर्या ची कुमारावस्थेतील भूमिका साकारली आहे. ग्रामीण भागात बनलेल्या 'सूर्या' चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड होणे ही भारतीय सिनेमासाठी देखील अभिमानाची बाब आहे.