धाराशिव (प्रतिनिधी)-येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राचार्य पी. एन. पाटील यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख होते. संस्था सचिव भाई धनंजय पाटील, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक के. बी. घोडके, प्राचार्य पी. एन. पाटील, उपप्राचार्य एस. पी. मुंडे, पर्यवेक्षक अमोल दीक्षित, पर्यवेक्षक व्ही. के. देशमुख, माजी उपमुख्याद्यापक सी. एन. क्षीरसागर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखाव्यात, वास्तव स्वातंत्र व आभासी स्वातंत्र ओळखावे. वास्तव स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळावे यासाठी भयमुक्त वातावरण असावे. दडपण झुगारून द्या समर्थ भारताचा नागरिक म्हणून पुढे या, उध्दारक शक्ती म्हणून पुढे या असे अध्यक्षिय भाषणात एम.डी. देशमुख यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर विविध शालेय उपक्रम व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. एन. पाटील यांनी केले. सुत्रसंचालन सुहासिनी जाधव यांनी केले व आभार पर्यवेक्षक अमोल दिक्षित यांनी मानले. कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.