भूम (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त सौ. राणी ताराराजा प्रशालेत वह्या, दप्तर गरजू विद्यार्थ्यास वाटप करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी स्वरा प्रदीप गवळी हिने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण केले.

या कार्यक्रमास अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जंयती उत्सव कमिटी अध्यक्ष प्रदीप साठे, अण्णाभाऊ साठे युवा मंच अध्यक्ष गणेश साठे, कोषाध्यक्ष किरण साठे, सचिव सचिन साठे, सदस्य प्रमोद साठे, विशाल साठे, सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थेचे भूम तालुका समन्वयक चंद्रशेखर देशमुख, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.शामल  तांबारे मॅडम, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमोल पुरंदरे सर , प्रमोद बाकलीकर सर, संतोष कुलकर्णी,परमेश्वर धुमाळ सर, निलेश लोखंडे सर, अनिरुद्ध ऊनवणे, शितल राऊत मॅडम, पूजा भारती मॅडम आदि उपस्थित होते. या कार्यक्रमात एकूण 50 गरजू विद्यार्थ्यास प्रत्येकी दोन वह्या एक दप्तर देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद बाकलीकर  यांनी केले. तर आभार प्रदीप साठे यांनी मानले.

 
Top