कळंब (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांकडून सातत्याने मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर होत असलेल्या टिकेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, खा. अनिल बोन्डे, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला वराहाची नावे देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यापुढे ही भाजपचे नेते असेच व्यक्त होत राहिले तर हे जोडे प्रतिमेला नाही तर प्रत्यक्षात त्यांना जाऊन मारू असा इशारा आंदोलकानी यावेळी दिला आहे.
जरांगे पाटील यांनी आदेश दिला तर मराठा उमेदवार उभा करुन तो निवडून आणू, आणि लोकसभेप्रमाणे येणाऱ्या विधानसभेला ही मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना मराठा समाज जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा ही यावेळी आंदोलकानी दिला आहे.