परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे आणि उपविभागीय अधिकारी भूम वैशाली पाटील यांच्या आदेशानुसार महसूल पंधरवडा दिनानिमित्त परंडा तहसीलचे तहसीलदार घनश्याम अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी भविष्यात काय करावे कोणत्या दिशाने जावे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव उपस्थित होतेफ तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, नायब तहसीलदार उत्कर्षा जाधव,नायब तहसीलदार पूजा गोरे उपस्थित होते.या कार्यक्रमात नायब तहसीलदार उत्कर्षा जाधव आणि नायब तहसीलदार पूजा गोरे यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावरती संवाद साधला. तसेच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले.या संवाद कार्यक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा विषयी प्रश्न विचारले त्याचे निरासन दोन्ही नायब तहसीलदार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.

यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ भागातील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारी तलाठी चंद्रकांत कसाब ,जीवन बनसोडे महाविद्यालयातील कर्मचारी रामराजे जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी करून कार्यक्रमाचे आभार मानले.

 
Top