भूम (प्रतिनिधी)- श्री देशभूषण कुलभूषण विद्यालय कुलथनगिरी येथे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूमच्या सतरा वर्ष वयोगट मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला व त्यांची भूम तालुक्यातून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सहभागी खेळाडू श्रावणी मुळे, शेळके संध्या, डोके समृद्धी, हिवरे ईश्वरी, गिलबिले स्नेहा, मुंडेकर प्रीती यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमान भालेराव, संस्थेचे सचिव व पर्यवेक्षक सतीश व त्यांना मार्गदर्शन करणारे मिसाळ आप्पा व जयंत शिंदे उपस्थितीत करण्यात आला.