धाराशिव (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीच्या काळात अनेक विकास कामे मंजूर करून आणली होती. शहरातील रस्ते व विकास कामे, उद्यान या सर्व कामांवर राज्य सरकारने स्थगिती आणली. केवळ आम्ही सरकारसोबत गेलो नाही हा त्यांच्या मुळ राग आहे. हा राग सरकाने आमच्यावर काढावा. जनतेला का वेटीस धरता? असा प्रश्न खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

शनिवारी दि. 3 ऑगस्ट रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेस आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सोमनाथ गुरव आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांना पराभव पचवता येत नसल्याने कोर्टात गेले आहेत. मी 3 लाख 29 हजार मतांनी लोकसभा निवडणुकीत निवडून आलो आहे.  गेल्या 40 वर्षात संत गोरोबाकाकांच्या घरावरील पत्रे देखील बदलेले नाहीत. ते तुळजाभवानी मंदिराचा का विकास करणार. पुर्वी सारखे पैसा व दहशतीचे राजकारण राहिले नाही हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. लोकांसाठी वेळे दिला तरच लोक निवडून देतात, नाही तर घरी बसवतात अशा इशाराही ओमराजे निंबाळकर यांनी दिला. 

आमदार कैलास पाटील यांनी महाविकास आघाडीच्यावतीने शहरातील मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांना या सरकारने स्थगिती दिली. या संदर्भात स्थगिती उठविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने आदेश देवून देखील नगर विकास विभागाने ही स्थगिती उठवलेली नाही. केवळ आम्ही त्यांच्या सोबत गेलो नाही हा राग आमच्यावर काढण्याऐवजी जनतेवर काढत आहेत. अनेक विकास कामे अंतिम ठप्प्यात असताना यंत्रणा बदलली गेली अशी टिका आमदार कैलास पाटील यांनी केली. यावेळी आमदार पाटील यांनी तडवळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी बाजार समितीची जागा मागितली असता बाजार भावाप्रमाणे जागा देण्याचे मान्य केले. सदर जागा विना मुल्य मिळणे अपेक्षित होते असे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार शहराच्या विकासाचे प्रश्न सोडवत नाहीत. 15 व्या वित्त आयोगाचे 6 कोटी रूपये आले. तर या शहराचे प्रोत्साहनपर अनुदान बंद करण्यात आले आहे. याबाबत सरकार काहीच करत नाही. अमृत दोन या योजनेतून उजनी धरणातील पाणी धाराशिव शहराला मिळण्यासाठी 2052 पर्यंतचे आरक्षण आम्ही तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून करून घेतले होते. परंतु या कामालाही विरोधकांनी आठकाठी आणली असेही मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितले. 

 
Top