धाराशिव (प्रतिनिधी)- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, 66 वा वर्धापन दिन शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशासकीय इमारतीसमोरील हिरवळीवर विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्राध्यापक डाॅ. प्रशांत दिक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येेने उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सह्याद्री ब्लड बँक धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. पी. पी. दीक्षित यांनी शिबिरास भेट देऊन सहभागी विद्यार्थी व ब्लड बँकेचे कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. कार्यक्रमाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आला. सह्याद्री ब्लड बँक धाराशिव येथील
ब्लड बँक टेक्निशियन महेश तोडकरी, मनोज उंबरे, सोहेल कोतवाल यांनी रक्त संकलन कार्य पार पाडले. तसेच सह्याद्री ब्लड बँकेचे संचालक शशिकांत करंजकर व टेक्निकल सुपरवायझर अल्केश पोहरेगांवकर आणि जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. जितेंद्र कुलकर्णी यांनी शिबिराला भेट दिली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. मेघश्याम पाटिल व डॉ. राहुल खोब्रागडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. एकुण 24 रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले. रक्तदानसोबतच विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी तसेच हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.