तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण संघर्षची पुढील दिशा ठरविण्यासाठी आंतरवाली येथे 29 आँगस्टला या असे आवाहन मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी राञी श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर मंदीर समोर बोलताना केले.
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांचे तिर्थक्षेत्र तुळजापूरात तब्बल चार तास उशीरा आगमन होवुन पाऊस होत असताना प्रचंड संख्येने मराठा बांधव उपस्थितीत होते. प्रथमता जेसीबीने व चिमुकल्यांच्या हस्ते पाचशे किलो फुलांचा हार घालुन जरांगे पाटील यांचे स्वागत सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले. यावेळी फटाक्याची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले कि छञपती शिवाजी महाराज यांना वदंन करुन श्रीतुळजाभवानी मातेच्या पविञ नगरीत सर्वांना जय शिवराय या पविञ स्थळी तुमच्या काय मनात आहे ते जास्त काही बोलणार नाही. धाराशिव जिल्हयाने आमच्या मागे मोठी ताकद उभी केली आहे. ते योगदान कधीच वाया जावू देणार नाही. मराठ्यांचा फैसला 29 आँगस्टला होणार असल्याचे स्पष्ट केले. या सभेला रात्र असुन महिलांची संख्या लक्षणीय होती.