तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी राञी तिर्थक्षेत्र तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी मातेची पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले. नंतर देविजींच्या मंगळवार सांयकाळच्या विविध धार्मिक विधीत भाग घेतला.

मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांनी देविच्या वारा दिवशी राञी दहा वाजत श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ आले असता थेट श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीरात जावुन पुजा अर्चा केली. यावेळी पुजेचे पौराहित्य पुजारी कुमार टोले यांनी केले. नंतर त्यांनी महंत तुकोजीबुवांचा मठात जावुन श्रीअन्नपुर्णा देविचे दर्शन घेतले. नंतर देविचे महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा यांचे दर्शन घेतले. यावेळी आशिर्वाद देवुन त्यांचा देविचा प्रसाद देवुन शाल घालुन सन्मान केला. नंतर त्यांनी 

नंतर दलित बांधवाचे आराध्य दैवत असणाऱ्या अदिमाय अदिशक्ति मंदिरात जावुन मातंगी देविचे मनोभावे दर्शन घेतले. नंतर ते मंदीरा बाहेर आले. जेसीबीने व चिमुकल्यांच्या हस्ते पाचशे किलो फुलांचा हार घालुन जरांगे पाटील यांचे स्वागत सकल मराठा समाजाच्यावतीने श्रीतुळजाभवानी मंदिरात करण्यात आले.

 
Top