ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील पुरातन नगरेश्वर महादेव मंदिर परिसरातील गावातील तरुणांनी एकत्र येत परिसराची साफसफाई करत स्वच्छता मोहीम राबवली.

ढोकी येथील नगरेश्वर नगरामध्ये पुरातन महादेव मंदिर असून या मंदिरासमोर एक निजामकालीन बाराव (विहीर) देखील आहे. यावर्षी च्या पावसाळ्यात झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरामध्ये व बारवाच्या आत मध्ये व आजूबाजूस घाणीचे व गवताचे साम्राज्य पसरले होते. परंतु आता श्रावण मास चालू होत असल्याने या महिन्यांमध्ये मंदिरात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी असते. भावीक भक्तांना अस्वच्छतेचे दर्शन घडू नये म्हणून श्रावण मासाचे औचित्य साधत ढोकी येथील तरुण वर्ग एकत्र येत मंदिर स्वच्छतेची मोहीम हाती घेतली व हा अस्वच्छ झालेला परिसर काही तासातच चकाचक करण्यात आला. मंदिराच्या आजूबाजूला वाढलेले गवत, तसेच मंदिराच्या सभामंडपामध्ये पाणी मारून फरशी स्वच्छ करण्यात आली. गाभाऱ्यात देखील पाण्याने स्वच्छता केली. तसेच मंदिरासमोर असलेला निजामकालीन बारवा या आजूबाजूचे वाढलेले गवत व बारावातील गवत उपटून बाहेर काढण्यात आल्याने बारव देखील स्वच्छ करून चकाचक करण्यात आला. या तरुणाच्या स्वच्छता मोहिमेमुळे ढोकी व परिसरातील भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या स्वच्छता मोहिमेसाठी गावातील तरुण बालाजी लंगडे, गुणवंत सुतार, अंकुश जाधव, पंकज देशपांडे, राज काळे, अर्जुन इंगळे, धनराज गडकर, ऋतुराज सुतार, विष्णू गरड, समर्थ लंगडे, दिग्विजय तिवारी, आदींनी परिश्रम घेत मंदिर परिसराची स्वच्छता केली.

 
Top