तुळजापूर (प्रतिनिधी)-  राज्यसरकारने  वर्ग -2 जमीने वर्ग -1 मध्ये समाविष्ठ करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची लवकरात लवकर  सरसकट कुणालाही न वगळता  अंमलबजावणी करण्यात यावी याबाबतचे निवेदन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसिलदार तुळजापूर मार्फत निवेदन देउन मागणी केली आहे.

 महाराष्ट्र सरकारने नुकताच वर्ग 2 जमीने वर्ग 1, करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने सदरील निर्णय प्रक्रिया बाबत संबंधीत कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी व सदरील निर्णयाची अमंलबजावणी करण्यात यावी. सरकारने घेतलेला निर्णय या मुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे. सदरील निर्णयाची अमलबजावणी त्वरीत करण्यात यावी याकडे अनेक नागरिकाचे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे सरकारने घेतलेला  सदरील वर्ग - 2 जमीने चे वर्ग -1 मध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाची त्वरीत अमलबजावणी बाबत योग्य तो सकारात्मक कार्यवाही त्वरीत करण्यात यावी  तसेच धाराशिव जिल्हा व परिसरामधील अनेक शेतकऱ्यांचे  जमीनी 1 मधुन 2 मध्ये गेल्या आहेत. गेल्या 40 ते 50 वर्षे पासुन जमीन वर्ग  -एक मध्ये  असताना गेल्या वर्षी अचानक  वर्ग -दोन  मध्ये समाविष्ठ केल्यामुळे अनेकांचे  बैंकेत लोण - कर्ज प्रकरणे प्रलंबीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी वर्ग , स्थानीक नागरीक  अडचणीत आले आहे. याबाबत राज्य सरकार वर्ग -दोन नंबर ची  जमीनी वर्ग - एक मध्ये समाविष्ठ करणार अशी घोषणा केली आहे. तरी सदरील निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी आपचे जिल्हाउपाध्यक्ष मधुकर शेळके, शहराध्यक्ष किरण यादव यांनी केले.

 
Top