तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीच्या आंदोलन पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ परिपञक काढुन विभाग नियंत्रकांना प्रवाशांची गैरसोय होवू नये अशा सुचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीने राज्य परिवहन महामंडळातील कर्मचा-यांच्या प्रलंबित आर्थिकमागण्यांच्या सोडवणूकीकरीता दिनांक 03.09.2024 रोजी पासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर याचा ञास प्रवाशांना होवू नये, त्यांची गैरसोय होवू म्हणून यासाठी व्यवस्थापक मोहनदास भरकट यांनी संबंधित विभाग नियंत्रक यांना परिपञक काढुन पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या आहेत.
यात रा.प. महामंडळातील कर्मचा-यांनी बेमुदत धरणे आंदोलनात भाग घेणे गैरवर्तणूकीची बाब समजण्यात येईल व अशा कर्मचा-यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, कर्मचा-यांनी बेमुदत धरणे आंदोलनात भाग न घेण्याविषयी व सर्व कर्मचा-यास नेहमीप्रमाणे कार्यालयात/ आगारात उपस्थित राहण्यासाठी आदेशित करावे.
बेमुदत धरणे आंदोलन काळात दैनंदिन प्रवाशी वाहतुकीवर परिणाम होणार नाही व प्रवाशांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात याव्यात. गरज भासल्यास गृहरक्षक / पोलीस दलाची मदत घ्यावी. ेमुदत धरणे आंदोलन काळात घ्यावयाच्या खबरदारीच्या अनुषंगाने संदर्भित परिपत्रकातील सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.सर्व घटक प्रमुखांनी बेमुदत धरणे आंदोलन कालावधीत कर्मचा-यांच्या गैरहजेरीची खाली दिलेल्या विहीत नमुन्यातील त्या दिवसांची सकाळच्या प्रहरातील माहिती दुपारी 2.00 वाजेपर्यंत व दुपारच्या प्रहरातील माहिती ही दुपारी 4.00 वाजेपर्यंत मुख्य कामगार अधिकारी यांच्याकडे पाठवावी, मुख्य कामगार अधिकारी यांनी सदरची माहिती संकलीत करुन मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना सादर करावी.