तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचीकुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मंदीरातील साडेआठ कोठी रुपये अपहार प्रकरणी सोळा जणांनवर गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदू जनजागरण समितीने नुतन पोलिस अधीक्षक संजय जाधव यांना दिले.
उच्च न्यायालयाचा निकाल दि. 09/05/2024 आदेशा नुसार, व गुन्हे अन्वेषण विभाग, जिल्हा पोलीस प्रमुख श्री. शंकर केंगार यांचा अहवाल दि. 22/09/2017 नुसार साडे आठ कोटीचा अपहार करणाऱ्या 16 व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवावा. हा भ्रष्टाचार वर्षे 1991-2009 चा आहे. उच्च न्यायालयाने तसे स्पष्ट आदेश दिले आहेत. कृपया अधिक वेळ न दवडता फौजदारी गुन्हे नोंदवा व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन त्वरित करावे. या निवेदनावर किशोर जगताप, राजन बुणगे, किशोर गंगणे, विनोद रसाळ, अमित कदम, अँड. शिरीष कुलकर्णी, अजय सांळुके यांच्या स्वाक्षरी आहेत.