धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी कार्यालय प्रतिष्ठान भवन धाराशिव येथे 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अनंत देशमुख, संपत आबा डोके, बापू पवार, लाटे सर, झुंबर आबा,  गवळी सर, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, किशोर पवार, मेसा जानराव, संग्राम बनसोडे,सागर दंडनाईक यांसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top