कळंब (प्रतिनिधी)- प्रतीवर्षीप्रमाणे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयांत सी. रंगनाथन यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जागतिक कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ व भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक म्हणून शियाळी रामामृत रंगनाथन यांना ओळखले जाते. त्यांचा 12 ऑगस्ट हा जन्मदिवस 'ग्रंथपाल दिन' म्हणून साजरा केला जातो. प्राध्यापकाची नौकरी सोडून त्यांनी ग्रंथपालाची नौकरी पत्करली. 1924 -1925 मध्ये त्यांनी इंग्लंडला जाऊन ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास केला. त्यांच्या पुढाकाराने ग्रंथालय संरक्षण कायदा अस्तित्वात आला. भारत सरकारने त्यांना 1957 मध्ये 'पद्मश्री' प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव केला. ग्रंथालय चळवळीत योगदान देणाऱ्या ग्रंथपाल कर्मचाऱ्यांना एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार दिले जातात. त्यानिमित्ताने ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. सी. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे सहसचिव बी.एस.गव्हाणे, संस्थेचे संचालक वसंतराव मडकेमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी ग्रंथपाल प्रा. अनिल फाटक, सदस्य प्रा. डॉ. दादाराव गुंडरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. दीपक सूर्यवंशी,प्रा. सूरज गपाट आदी प्राध्यापक, ग्रंथातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.