तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्यातील एक लाख बेपत्ता मुली व महिलांचा तात्काळ शोध घेऊन बदलापूर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंञी तथा गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांना तहसिलदार माध्यमातून निवेदन देवुन केली.
महाराष्ट्र सरकारने आणि गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मध्ये मुली आणि महिलां बेपत्ता झाले आहेत. यासाठी राज्य सरकारने कोणत्या
उपाययोजना केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यतील मुली आणि महिला यांच्या सुरक्षा व्यवस्था संदर्भात काय नियोजन केले आहे. राज्यात वारंवार अश्या घटना मोठ्या प्रमाणात राज्याच्या विविध भागात होत आहेत. सर्वसामान्य नागरिक वरिल घटनामुळे भयभीत आहे व असुरक्षीततेची भावना निर्माण झाल्याने यांच्या सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. बदलापूर प्रकरणी पिंडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे व तिच्या कुंटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी. याबाबत तात्काळ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना आदेश देण्यात यावे. अशी मागणी धाराशिव जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके, किरण यादव, प्रशांत इंगळे यांनी तहसीलदार तुळजापूर यांच्याकडे केली.