कळंब (प्रतिनिधी)-  शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे अंतर्गत गुणवत्ता कक्ष,महिला सक्षमीकरणक कक्ष आणि सृष्टी  सामाजिक विकास संस्था गडचिरोली, लोकहीत सामाजिक संस्था कळंब आणि (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने ,कामाच्या ठिकाणी बालकांवर होणाऱ्या इतर अत्याचारांमध्ये लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय समाजात अनेक ठिकाणी बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या समस्या समोर येत आहेत. याविषयी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. बालकांच्या हक्कासाठी, त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन जागृती घडवणे आवश्यक आहे, असे मत दीपाली काळे (पुणे) यांनी व्यक्त केले.

दि. 21 ऑगस्ट रोजी आयोजित बाल हक्क बाल लैंगिक शोषण, या विषयावर जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.  माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांपर्यंत तसेच विविध उपक्रमांतून समाजापर्यंत पोहोचतात. त्यासाठी आधी युवकांनी जागरूक होणे आवश्यक आहे. या उदेशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. मंदा  केलझरकर आणि केशव गुरनुळे यांनी  बाल हक्क कायद्याविषयी तसेच बालकांचे लैंगिक शोषण याविषयी माहिती दिली. सध्या समाजात बालकांचे लैंगिक शोषण होते. याविषयी अपेक्षित तशी जागृती झाली नाही. त्यामुळे अत्याचाराविरोधात आवाज उठवल्या जात नाही. त्यासाठी समाजात माहिती पोहोचवणे आवश्यक असून, युवकांनी या कामासाठी पुढाकार घ्यावा. बालकांसाठी असणारे कायदे, त्यांचे हक्क याविषयी प्रत्येकाला माहिती असणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरण कक्षच्या  माध्यमातून याविषयी जनजागृती करता येते. यासाठी सर्वांनी  माहिती करून घेणे गरजेचे आहे. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी व्यक्त केले. प्रा. अर्चना मुखेडकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मीनाक्षी जाधव यांनी केले. तर आयोजन डॉ. पल्लवी उंदरे यांनी केले.  तर आभार प्रदर्शन अमर ताटे यांनी  केले. 

 
Top