धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, सगेसोयरे संबंधी आदेश लागू करा, मराठा आंदोलनावरील गुन्हे परत घ्या यासाठी मराठवाडाभर मराठा आरक्षण शांतता जागृता रॅली सुरू केली आहे. बुधवार दि. 10 जुलै रोजी ही रॅली धाराशिवमध्ये दुपारी 1.30 वाजता आली. या रॅलीमुळे शहरात सर्वत्र उत्साहाताचे वातावरण निर्माण झाले होते. रॅलीची सांगता करताना झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस,भुजबळ यांच्यावर जोरदार टिका केली. 

अहिल्यादेवी होळकर चौकातून या रॅलीला सुरूवात झाली. रॅलीमध्ये धनगरी ढोल, टाळ, मृदंग आदी सहभागी होते. आण्णाभाऊ साठे चौकातून मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीने धाराशिवचे ग्रामदैवत श्री धारासूर मर्दिनी, हजरत खॉजा शमशोद्दीन गाजी दर्गा, विजय चौक, नेहरू चौक, काळा मारूती चौक, संत गाढगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये लाखो मराठा बांधव उपस्थित होते. मराठा समाजाला आवाहन करताना जरांगे पाटील यांनी बघ्याची भूमिका बंद करा. तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे रहा. त्यांच्या मुंडक्यावर पाया देवून मी आरक्षण मिळतो असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. आरक्षण दिल्याशिवाय मी मरणार नाही. आरक्षण हे माझे शेवटचे स्वप्न आहे. मला पैसा नको, तुमचे बळ द्या मला. मराठा समाजातील लेकरांना अधिकारी करण्याचे स्वप्न आहे. त्यांनी परत एकदा फडणवीस व भुजबळ यांना इशारा देत आमच्या व्यथा तुम्हाला कळणार नाहीत. तुम्ही आडवे येवू नका असे सांगितले.  या रॅलीमध्ये 1 हजार स्वयसेवक व 200 महिला स्वयंसेवक यांनी आपले काम केले. रॅलीमध्ये हजारो घोषणा फलक होते. जरांगे पाटील यांचे भाषण सर्वत्र ऐकण्यास मिळावे यासाठी काळा मारूती चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व शहरातील अनेक भागात 250 ध्वनिक्षेपण बसविण्यात आले होते. 


 
Top